पुनर्जन्म म्हणजे वर्तमानात सक्रिय झालेली स्मृती, आपला पुनर्जन्म होत नाही आपल्याला फक्त आठवू शकतं. आठवणीचा संबंध मेंदूशी आहे, आपल्याशी नाही. आपण जसेच्या तसे राहतो ही मूळ गोष्ट आहे, कर्म आपल्यावर कोणताही परिणाम करत नाही हा बोध कर्मात मजा आणतो. संदीप खरेच्या ‘आताशा असे हे मला काय होते’ मधल्या ओळी बघा:
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा,
असे हालते आत हळूवार काही,
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा
व्यक्त जगाचा आपल्याला होणारा स्पर्श हा पाण्याला होणाऱ्या चांदण्याच्या स्पर्शा सारखा आहे हे समजलं की जगण्याची मजा अफलातून आहे.

संजय