"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
वेटिंग फॉर गोदो बद्दल मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा 'टॉम ऑल्टर' त्यातली लकीची भूमिका मराठी आवृत्तीत करणार अशी काहीशी बातमी होती. तेव्हा नाटकाबद्दल चार-दोन ओळी पेपरात वाचल्या आणि त्यातलं अवाक्षरही कळलं नव्हतं. मग नाटकाबद्दल मी तसा विसरून गेलो. पण ते नाव, विचित्र नाव मी कधीच विसरलो नाही. मग पुन्हा एके दिवशी कुठेतरी ह्याच नाटकाचा उल्लेख वाचला. तेव्हा हाताशी विकिपीडिया होता. लगोलग विकिमातेला प्रणाम केला. आणि मला धक्का बसला. हे नाटक ऍब्झर्डिस्ट असल्याचं लिहिलं होतं. माझी गाडी नेहमीच ऍब्झर्डिझमपाशी येऊन थांबते. मग प्लॉट वाचायला गेलो, पण ...