मी जेव्हा काही मजकूर मनोगत वर डकवतो, तेव्हा तो दिसतच नाही.
ही तुमची अडचण नीट कळलेली नाही. पण इतर ठिकाणांहून प्रत काढलेला मजकूर प्रथम नोटपॅडमध्ये चिकटवा आणि नोटपॅडमधून पुन्हा प्रतघेऊन येथे चिकटवा. असे केल्याने त्या मजकुरात असणारे जुन्या ठिकाणचे संदर्भ निघून जातात.

लिहीलेल्या मजकूरात दुरुस्ती करायला, सहसा आपण मूळ शब्दाला हायलाईट केले अन तिथे टंकले
काही विशिष्ट परिस्थीत ही अडचण येऊ शकते. (यामागे अनेक गुंतागुंतीची कारणे आहेत.) हायलाइट केलेला मजकूर काढून टाकावा लागतो.
उपाय : मूषकाने निवडलेला मजकूर काढून टाकण्यसाठी स्पेसबार वापरून तेथे मोकळी जागा तयार करावी.