अनन्या, मनोगतावर तुझे स्वागत आहे.

कोणाला काय आवडते, आणि काय करणे योग्य आहे यात नेहमी तफावत असते. त्यात 'काय करणे योग्य आहे' हा कोणतेही एक निश्चित उत्तर नसलेला अस प्रश्न आहे. एखादी गोष्ट माझ्यासाठी योग्य असेल, ती दुसर्या कुणासाठी तरी अयोग्य असू शकते.
असो.
१) ज्यांना शाळेत जायचे नसते, पण पालक पाठवतात - आजुबाजुला पाहिल्यास असे दिसते, की साधारण पणे शाळेत जाऊन शिकणारे, पुढे कॉलेजला जाणारे असे जे असतात, त्यांच पुढे भले होण्याचे प्रमाण अधिक असते. जगात कसे वावरावे, भाषेचा किमान वापर, जगण्यास आवश्यक गणित वगैरे शाळेत व्यवस्थित शिकण्यास मिळते. शिवाय 'दुसरे काहीतरी आवडणारे' करायचे वयही शालेय मुलाचे झालेले नसते. त्यामुळे त्या वयात, इतर मुलांसारखे, आणि आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे शाळेत जावे. शाळेत न जाता जे काही करावेसे वाटत असेल, ते शाळेत जाऊन उरलेल्या वेळात करावे. आणि योग्य वेळ येताच त्यात झोकून द्यावे.
२) ज्यांना शाळेत जायचे असते, पण पालक पाठवत नाहीत - बर्याच वेळेला पालकांची परिस्थिती त्याला जवाबदार असते. कदाचित स्वतःच्या लहानपणी शाळेत न गेल्यामुळे ती परिस्थिती उद्भवलेली असते. एक मुल शाळेत गेले, तर कमावणारे दोन हात कमी होतात, आणि काही कुटुंबांना ते खरोखर परवडत नाही. सरकार, सामाजिक संघटना, यांच्या प्रयत्नांतून ही स्थिती हळूहळू पालटेल अशी आपण आशा करुया.