मनोगतावर मी ही तुझे स्वागत करतो.
शाळा आवडणे किंवा न आवडण्याचा प्रश्न हा विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा आणि शाळेच्या वातावरणाचा असतो. आपल्या मुलाला शाळा का आवडत नाही, हे पालकांनी समजून त्यावर उपाय केला पाहिजे. कधी हा प्रश्न शाळा बदलून सुटू शकतो, तर कधी पाल्याला शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन.
जीवनात काही गोष्टी अश्या असतात, की त्या आपल्याला जरी कंटाळवाण्या वाटल्या, आवडत नसल्या, तरी भविष्यासाठी त्या महत्त्वाच्या असतात. त्या लहान मुले समजून घेऊ शकत नाही, म्हणून (उदाहरणार्थ शाळेत जाण्याची) जबरदस्ती असते.
समजा एखाद्या विद्यार्थ्याला संगीतात रस आहे, तर त्याची ही आवड जोपासणे तितकेच महत्त्वाचे आहे, जितके शाळेत जाणे. त्याचा रस कशात आहे, हे समजून पालकांनी त्याला त्याच्या आवडीच गोष्टी करू दिल्या तर तो अभ्यास/ शाळा यातही रस घेऊ लागेल. मी तुझं थोडं ऐकतो, तूही माझं ऐक, असं म्हणून "नाठाळ आणि बुद्दू" म्हणवल्या जाणारे माझे २ विद्यार्थी आज चांगल्या क्षेत्रात प्रगतीवर आहेत, हे मी बघितलेले उदाहरण आहे. असे बरेच असतील. नाही का ?
शाळेत जाऊ न देण्याबद्दल मंदार म्हणतात ते अगदी बरोबर आहे.