उद्योजकानेही हा एक विचार नक्की करावा.
"जर काम ८ तासात पूर्ण होणारे असेल तर त्याला उगाच १०-१२ तास लावून संगणक, वातानुकूलित यंत्रे, चहा-कॉफीची मशीने, वीज, इत्यादीची नासाडी (ऱ्हास? ) टाळून जो फायदा होईल, तो त्याला हवाहवासाच असेल ना? आणि एखादे काम विशिष्ट वेळेत पूर्ण झालेच पाहिजे नाहीतर ८ तासाने कंपनीचे दार बंद होईल आणि घरुनही हे काम करता येणार नाही, असा दंडक (अधिक योग्य शब्द सुचवा) असेल तर मग कसले आलेत ईमेल आणि कसले ब्लॉग्ज अन कसली कॉफी-चर्चा.... ८ तासात मग फक्त कामच होईल, नाही का? ज्यांना ईमेल, ब्लॉग्ज, चॅटींग, हे सगळं करायचं आहे, ते घरी जाउन करू शकतात, अगदी शांतपणे"
हेच उत्तर नारायण मूर्तींच्या (नावाने? ) ईमेलसाठी योग्य नाही का? ते ८ तास काम करा म्हणू शकतात, तर मग तशी आज्ञा का देत नाही.
अवांतर :-कोण्या एका आय टि कंपनीत म्हणे काही काळापूर्वी मानसोपचार तज्ञांची आवशक्यता होती? कशाला?