स्वाती दिनेश, नंदन, विजय देशमुख, सविता००१, आजानुकर्ण, महेश, सुधीर कांदळकर, रोहिणी, अंजू, दीप्ती जोशी, मऊमाऊ, वरदा, नरेंद्र गोळे, विनायक, चित्त, प्रवासी,

मी मनोगताच्या २००८ च्या दिवाळी अंकात लेखन केले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर मी असे स्वतंत्र लिखाण केले. जरा बिचकतच पाठवले होते. पण तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाने हुरूप आला. सर्वांचे मनःपूर्वक आभार.

स्वाती आणि वरदा,

प्रतिसादांमध्ये काहींनी माझ्या प्रांजळपणाला दाद दिली आहे. पण मला मात्र तुम्हा दोघींच्या प्रांजळपणाला दाद द्यावीशी वाटतेय!

प्रवासी,

तुमच्या प्रतिसादाबद्दल काय बोलायचे? वाचून आनंद वाटला. आभार.

-मीरा