वरच्या मजकूरात वाक्यांची/शब्दांची रचना जरा वेडीवाकडी झाली असे वाटते, म्हणने लवकर कळत नाही . तरी जे जसे समजले त्याला प्रतिसाद देत आहे.
कंपनी कामाची वेळ ठरवून देते. ती कशी पाळायची ते कर्मचाऱ्याचे काम.
सोयी सुविधा कंपनी कर्मचाऱ्याच्या सोयीसाठी देते. जेणेकरून तो अधिक कार्यक्षमतेने/उत्साहाने काम करू शकेल. त्यामुळे ती गुंतवणूक ही नासाडी नव्हे.
इंग्रजी मध्ये म्हण आहे 'Freedom comes with responsibility' म्हणजे या सोयीसुविधा, घरून देखिल काम करण्याची सोय/मुभा, हे सगळे कंपनी देते. परंतु त्या सोयी सवलती वापरताना कर्मचाऱ्याची सुद्धा जवाबदारी वाढतेच की. या सर्व सोयींचा उपयोग करून / उपभोग घेऊन आपण आपले काम वेळेत पूर्ण करू शकतोच की. घरून काम करण्याची परवानगी येवढ्यासाठी की काही आणिबाणीच्या प्रसंगात याचा बापर व्हावा.
शिवाय ठरलेल्या वेळेपेक्षा जास्तवेळ ऑफिसमध्ये रेंगाळत राहण्याची सवय बऱ्याच कर्मचाऱ्यांना असते. दिवसभर अपेक्षीत काम करायचे नाही आणि नंतर उशीर पर्यंत बसायाचे. म्हणजे आपणच समोरच्याना (वरिष्ठांना) सवय लावतो की हा/ही जास्त वेळ बसतो/ बसू शकतो... आणि मग उशीरा पर्यंत काम करत बसण्याचा प्रकार (ट्रेंड) सुरू होतो. (प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. सगळेच कर्मचारी नुसतेच रेंगाळतात असे नव्हे)
आता राहीला प्रश्न ८ तासच काम करायची आज्ञा का नाही देत :
किमान किती तास काम करावे हे कंपनी सांगते / सांगू शकते. पण कमाल किती हे ज्याचे त्याने ठरवणे योग्य.
जर एखाद्याची जास्ती काम करायची इच्छा आणि शक्ती (यात शारिरीक मानसिक दोन्ही आले) असेल तर त्याची अडवणूक का करावी?
अवंतराविषयी : आय टी कंपनी येण्या आधी सुद्धा मनोरूग्णालये होतीच. म्हणजे समाजात मानसोपचार तज्ञही होतेच. बऱ्याच नॉन आय टी लोकांनाही मानसोपचार तज्ञांची मदत लागतेच की. तेव्हा केवळ "आय टी कंपनीत मानसोपचार तज्ञांची आवशक्यता होती" अशी बातमी करण्यात काही अर्थ नाही.
जे मनाने/शरीराने कमकुवत आहेत त्यानी त्याना जमेल झेपेल ते / तेवढेच काम करावे. उगाच दुसरा मला खूप काम लादतो / त्रास देतो म्हणून गळे काढण्यात काय अर्थ आहे. मुळात आपली कुवत बघून आपण काम करावे.
बाकी, श्री अनिलसाहेब, एकेरी संबोधले म्हणुन काही प्रॉब्लेम नाही. लहान / मोठा फारसा फरक पडत नाही. एकमेकांत लोभ असणे महत्वाचे. तसा तुमचा अंदाज बरोबर आहे. :)
-सचिन