आपले लिखाण जबरदस्त आहे. एवढ तर्कशुद्ध लिहायचं फार कठिण आहे. या सर्व अध्यात्मिक
सिद्धांताचे आपण व्यवहारात केलेले प्रयोग लिहिलेत तर ते जास्त मार्गदर्शक होईल. म्हणजे ते जास्त जवळचे वाटतील.
नाहीतर ते परके वाटत राहतील आणि हा फक्त वाचकांसाठी एक अभ्यास ठरेल. म्हणजे परीक्षा आली की करण्याचा. किंवा
चर्चासत्र गाजवण्यासाठी उपयोगी पडणारा. जोपर्यंत माणसाचे दैनंदिन प्रश्न ह्यायोगे सुटत नाहीत तो पर्यंत केवळ एक
शैक्षणिक रस (ऍकॅडेमिक इंटरेस्ट) घेण्यासाठीचे ज्ञान एवढेच त्याचे स्वरूप राहील. आपण वाईट वाटून घेऊ नये, केवळ
आपल्या लिखाणाला अशी दिशा दिलीत तर जास्त बरं वाटेल. पुन्हा एकदा सांगतो की आपलं लिखाण खरोखरीच चांगलं
असतं. आपल्या मार्गदर्शनाची  अपेक्षा  आहे. मी  हे सामान्य माणसाच्या दृष्टीने लिहिले आहे. कृपया गैरसमज नसाव. पु. ले. शु.