तुम्ही माझं लेखन नीट वाचा, 'जाणीवेचं विचारात रुपांतरण न होऊ देणं' हा संपूर्ण सुटकेचा आणि जीवन चित्रपटा सारखा बघता येण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. मला सत्य समजल्यामुळे मी माझं म्हणणं अत्यंत सोप्या पद्धतीनं मांडतो आणि जरी कुणाला हे कुणी तरी सांगीतलं आहे असं वाटलं तरी ते तसं नसतं. माझी पद्धत स्वतंत्र आहे, वाचकांनी ओपन माइंडनी  वाचायला हवं.

काल माझी आई म्हणाली बघू रे काय लिहीलयंस तर मी तिला प्रिंट आऊट दिला. सगळं वाचल्यावर ती म्हणाली 'किती सुरेख लिहीलयंस रे, गीतेत हेच सांगीतलं आहे! मी म्हटलं 'गीतेत असं कुठल्या श्लोकात सांगीतलं आहे दाखवतेस का? ती अजून शोधतेय!

तुम्ही पूर्वज्ञान सोडून वाचा, सांगीतलेला प्रयोग करून बघा तुम्हाला निश्चीत उपयोग होईल. मी याच्या वर काही दशकं घालवलीयंत, प्रसंगा प्रसंगातून माझा बोध नेला आहे आणि मानवी मनाचा इतका सखोल अभ्यास केला आहे की बोलता सोय नाही.

तुम्ही आत्मियतेनी लिहीलंय, मला ही तुमचा मानवी मनाचा अभ्यास किती सखोल आहे याची तुमच्या लेखना वरून कल्पना आली आहे. तुम्ही 'जाणीवेचं विचारात कसं रुपांतर होतं ते प्रसंगातून बघा मग आपण कसे अडकतो ते बघा आणि मला सांगा'. तुमच्या प्रतिसादाचा मला ही उपयोग होईल.

संजय