प्रतिसादांवरून असे वाटते आहे की, काम किती करायचे हे कर्मचाऱ्याच्या हातात असते असे बऱ्याच जणांना वाटत आहे. पण तसे काही नाही. बिडींग करताना १ वर्षाचा प्रोजेक्ट ६ महिन्यात करू असे सांगून प्रोजेक्ट 'जिंकला' जातो. आत वर्षाचे काम ६ महिन्यात करायचे म्हणजे ८ तासाचे १६ तास होणारच. मग कंपनी ने कामाचे तास ८ तास सांगोत की ९ तास, त्याला फारसा अर्थ उरत नाही.
एखादा ९ तासात घरी जायला निघाला की त्याची परस्पर अडवणूक केली जाते. मॅनेजमेंट कडे तक्रार केली जाते की तो काम व्यवस्थित करत नाही वगैरे. मॅनेजमेंटला प्रोजेक्ट डिलीव्हर करायचा असतो म्हणून ते सुद्धा यात सामील होतातच.

बरे, आता एवढे पैसे मिळतात, तर काम तर करायलाचे पाहिजे वगैरे मुद्दे आहेतच. परंतु लक्षात घ्या, कंपनीने पैसे हे दररोज ८-९ तासाच्या कामाचे दिलेले असतात. त्यात ओव्हरटाईम करावा लागेल असे म्हटलेले नसते.

महिनोमहिने १४-१५ तास, शनिवार रविवार सुद्द्धा, काम करावे लागले की मग मानसोपचार तज्ञाची गरज लागल्यास आश्चर्य नको.

अर्थात यातून पळवाट काढणारे सुद्द्धा आहेतच. १४ तास फक्त बसून दाखवणारे आणि ५ तासाचे सुद्धा काम न करणारे. पण व्यवस्थापन व्यवस्थित नसेल तर असे होणारच.

मुळातच मोठ्यात मोठा नफा कमावण्यासाठी, कमी लोकांकडून जास्त काम करवून घेण्याची वृत्ती पिळवणुकीस कारणीभुत ठरते आहे.

असो.

-
भटजी.