आपण केलेल प्रकटन खरोखरच खूप छान स्वरुपात शब्द बद्ध केल आहे. वैयक्तिक ह्या विषयावर आपला अभ्यास दांडगाच असावा ह्यात शंका नाही.  ईश्वर हा निर्गुण , निराकार आणि गुणातीत आहे . आपण ज्या भावात त्याचे ध्यान करतो तोच आकार तो धारण करतो, मग तो ते
रुप धारण करून स्मरणात राहतो. एखाद्या चित्रकाराने चितारलेली देवा दिकांची चित्रे ही त्यांच्या कल्पना शक्तीचा अविष्कार असतो, आणि मगत्याची प्रतिमा सामान्य जनात प्रचलीत होते , मग कोणी राम पाहत असेल, कोणी रहीम, कोणी जिजस, तर कोणी आणखीन काहि.. कडकडून भुकलागलेल्या भाकरीत देव दिसतो, पोट भर खाणाऱ्याला ते फक्त देह चालविण्याचे ईंधन असते. आपली निकड आणि आपल्या अपेक्षा, आपले भावच
त्याला गुण रुप चिटकवतात आणि मग तो त्या रुपात प्रगट होतो.
                   

आपल्या पुढील लेखास शुभेच्छा!