गेली कित्येक वर्षे 'जैन' प्रकारचे पदार्थ जगात सर्वत्र मिळत आहेत. उदा.

१. रेस्टॉरंट मध्ये मेनू उघडला तर काही पदार्थ 'जैन' अस्ल्याचे आपल्या लक्षात येइल.

२. विमानात JAIN MEAL मिळते - माझ्या माहिती प्रमाणे बऱ्याच कंपन्या तसे जेवण ठेवतात. अर्थात त्याची मागणी आगावू नोंदवावी लागते.

३. चक्क लक्झरी क्रुज वर सुद्धा बुफे असतो त्यात एक 'जैन' काउंटर असतो.

म्हणजेच 'जैन' प्रकारचे खाद्यप्रकार जगात कदाचित सगळ्या संबन्धितांना (खाणारे आणि व्यावसायिकरित्या खिलवणारे) माहित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या द्रुष्टीने जगात सर्वत्र मान्य झालेला तो एक शब्द आहे - त्यात जातीवाचक किंवा धर्म वाचक असे काहिच नाही. हल्ली तर नुसते जैन म्हणून सुद्धा चालत नाही - त्यात पण 'प्युअर जैन' आणि 'सेमी जैन' असे वर्गीकरण आहे!

'प्युअर जैन' प्रकारात कांदा-लसुण तर नाहीच, पण ईतर बरेच पदार्थ वर्ज्य आहेत उदा. - बटाटा, गाजर, बीट, मुळा, रताळी, वगैरे जमिनिखाली पिकणारे पदार्थ. (यात बटाटा प्रत्यक्ष जमिनिखाली पिकतो का, जमिनिखाली पिकणारे भुईमुगाचे दाणे त्यांना कसे चालतात वगैरे प्रश्न मी विचारून पाहिले आहेत - त्यांच्याकडे नीट उत्तर नाही - मग ते थोडे चिडतात सुद्धा). हे जिन्नस - म्हणजे बटाटा वगैरे आपण मात्र श्रावणात खातो. त्यामुळे जैन ते जैनच.

'सेमी जैन' प्रकारात फक्त कांदा लसुण वर्ज्य आहे.

आता श्रावण -

१. श्रावण वर्षात फक्त एकच महिना असतो. मग कांदालसुण नसलेला पदार्थ (श्रावण भेळ) त्या नावाने ईतर महिन्यात विकला तर कुणी चिकित्सक माणुस निमुट पणे खाण्याऐवजी विचारेल कि वैशाखात श्रावण भेळ कशी?

२. श्रावण माहित असलेले आणि तो व्यवस्थीत पाळणारे लोक जैन लोकांच्या तुलनेने जगात खुपच कमी आहेत त्यामुळे आधी रुढ झालेला शब्द खोडून निघेल आणि नवा फारसा माहित नसलेला आणि ईतर ११ महिन्यात खटकणारा शब्द जगभर स्विकारला जाणार का ही एक शंका.

याउपर आपण नवा शब्द वापरायला काही हरकत नाही, फक्त तो फारच कमी लोकांना माहित होईल.