कविता चांगली आहे. पाडून भाव, तो मलाच माझे शब्द आणि शब्दांचे कुंटणखाने ह्या द्विपदी जास्त आवडल्या.
पहिल्या ओळीबद्दल मला शंका आहे. ती जुनी वही दिसली खिळखिळली माझी-
ह्या ओळीचा अर्थ मला पुरेसा समजला नाही. माझी तंतरली तशी माझी खिळखिळली, की खिळखिळली हा शब्द वहीसाठी आहे? वहीसाठी असल्यास खिळखिळली वही की खिळखिळी वही? मी तरी खिळखिळी (झालेली) वही असा शब्द ऐकला आहे, खिळखिळली असा शब्द माझ्या माहितीत नव्हता. की खिळखिळी झालेली = खिळखिळली असा नवा शब्द कवीने तयार केला आहे?