अगदी अशीच शंका मलाही सुरवातीला आली होती; पण खिळखिळली असा शब्द खिळखिळलेली अशा अर्थानेही वापरता येईल असे वाटले.

अशी आणखी काही उदाहरणे :
शिकला-सवरला मनुष्य = शिकलेला सवरलेला मनुष्य
आल्यागेल्या माणसाची जाणीव = आलेल्या- गेलेल्या माणसाची जाणीव

१. माझ्या एका एकांकिकेत मी 'शिकलेला सवरलेला मनुष्य' असा वापर केलेला होता. पण बोलताना शिकला-सवरला असे वापरावे असे दिग्दर्शक आणि नटमंडळींचे म्हणणे होते.