अशी आणखी काही उदाहरणे :
शिकला-सवरला मनुष्य = शिकलेला सवरलेला मनुष्य१
आल्यागेल्या माणसाची जाणीव = आलेल्या- गेलेल्या माणसाची जाणीव
आणखी एक:
रंजले गांजले = रंजलेले गांजलेले
१. माझ्या एका एकांकिकेत मी 'शिकलेला सवरलेला मनुष्य' असा वापर केलेला
होता. पण बोलताना शिकला-सवरला असे वापरावे असे दिग्दर्शक आणि नटमंडळींचे
म्हणणे होते
शिकला-सवरला हे वापरात आहेच. तसेच हे 'लेला'ही जिभेला थोडेसे त्रासच देते. 'लैला'च्या बाबतीत मात्र असे वाटत नाही. इंग्रजीत 'लैला'चा उच्चार बहुधा जवळपास 'लेला' असाच करतात आणि तो गमतीदार वाटतो.