ही चर्चा वाचून मनापासून 'रीप्लाय' करावासा वाटला... मी स्वतः एक 'आय. टी. प्रोफेशनल' आहे... विषय एकदम मनाला भावला... मला योगयोगाने भारतात आणि भारताबाहेर दोन्हीकडे काम करण्याची संधी मिळली... तेन्व्हा आपसूकच फरक लक्षात आला...

भटजींच्यअ मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. 'ओव्हरटाईम' देणार नसतील आणि तरी कामगार (रिसोर्स) काम करणार असेल तर व्यवस्थापनापेक्शा जास्त दोष हा त्या 'सॉफ्टवेअर इंजीनीर्कडे' जातो. मालक लोकाना काय, काम करणारे पाहिजेच असतात.

स्वतः पासून सुरूवात करावी. ऑफिसच्या ठिकणी जादा तास बसू नये. वेळेवर यावे आणि वेळेवर निघून जावे. आपण अधिक वेळ बसल्यास आपण तेथील कामाची सन्स्कृती बिघडवत आहोत ह्याचे भान ठेवायला हवे. आणि ह्याचे दूरगामी परिणाम पूर्ण इंडस्ट्री वर होतात. हे लिहिता ना मला विनोबांच्या 'स्वरूप पहा' (पूस्तक : मधुकर ) ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

फार मुलभूत रीत्या जर विचार केला तर मला असे वाटते की... आयुष्य कसे जगायचे ह्याचा ठोक (रफ) अंदाज नसल्यामुळे हे होत असाव. मी एकांगी विचार करत असेनही... पण ही बाजू पण विचारात घेतली जावी असे मला वाटते...