कारण तुमचा हेतू शुद्ध आहे आणि मी तुमच्या लेखनातून तुमची सचोटी जाणली आहे. तुम्ही म्हणता तसं मी सत्य कसं शोधलं आणि मी कोणत्या प्रसंगातून कसा गेलो हे इतरांना उपयोगी होत नाही कारण प्रत्येकाच्या जीवनाला, प्रत्येक घटनेला अनेक अनाकलनिय पैलू असतात आणि त्यांचं एकमेकांशी साधर्म्य नसतं. ते सगळं लिखाण व्यक्तीगत होईल आणि 'असा प्रसंग आला तर असं उत्तर आहे' असं त्याचं स्वरुप होईल आणि मजा म्हणजे ते उत्तर त्यावेळी उपयोगी नसेल!
मी सर्वांना आता, या क्षणी, रोजच्या जीवनात अध्यात्माचा (थोडक्यात म्हणजे आपण निराकार आहोत या बोधाचा) कसा अफलातून उपयोग आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो बोध जीवनातला कोणताही प्रश्न सोडवू शकतो हे दाखवतोयं. सकृत दर्शनी हे फार सोपं आहे कारण एकच बोध जन्म, मृत्यू, नाती, कल्पना, धारणा, संस्कार, भीती, अस्वास्थ्य सगळं दूर करतो आणि जगण्यात तुफान मजा येते. मी अत्यंत मूलभूत अध्यात्मिक सत्य अतिशय सोप्या भाषेत मांडतोय कारण ती तुम्हाला मनापासून मुक्त करतील, तुम्हाला तुमच्या व्यवहारिक जीवनात प्रयोग करून बघता येतील. पण आपण निराकार आहोत हा अनुभव तितकाच दुर्लभ आहे कारण तुम्हाला तुमच्याच व्यक्तीगत जीवनावर प्रयोग करावे लागतील, माझ्या अनुभवांचा तुम्हाला उपयोग होणार नाही.
त्यातूनही तुम्हाला 'अशा प्रश्नाला काय उत्तर आहे' असं विचारायचं असलं तर मला व्य. नि. पाठवा (प्रशासकांनी माझी सुविधा पूर्ववत केल्यावर) मी तुम्हाला अक्षरशः पुढल्या क्षणी उत्तर देईन.
मला तुमचा राग येणं शक्य नाही, तुम्ही काहीही विचारा, आगदी वैयक्तीक विचारा मी जरुर उत्तर देईन
संजय