हिटलर आणि त्याने ज्यू वंशाच्या लोकांवर केलेले अत्याचार हा अतिशय संवेदनाशील विषय आहे ..
पण ज्याचं जळतं त्यालाच त्याचं दुःख कळतं -- हेच खरं
अगदी रोजच्या, सामान्य माणसांच्या आयुष्यात पण हेच घडताना दिसतं .
कोणाच्या घरातील , वैयक्तीक आयुष्यातील अप्रिय दुर्दैवी घटनांची चर्चा लोकं सर्रासपणे करतात ...
कुठल्याही टिप्पण्या करताना हा विचार करत नाही कि आपल्या बोलण्याने कोणाला किती त्रास होउ शकतो..
आणि आपण ज्या विषयावर बोलतो आहोत त्याची आपल्याला नक्की किती माहिती आहे? जी माहिती आहे ती खरी कि खोटी?
आणि ज्या विषयावर केवळ काही माहीती आहे म्हणून बोलणे योग्य आहे का? आपली स्वतःची तेव्हढी योग्यता आहे का?
लोकांच्या व्यस्त जीवन पद्धती मुळे संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत का? कि आपल्याला ४ क्षण हसता आलं, एनजॉय करता आलं कि झालं , मग त्या मुळे दुसऱ्या कोणाला कितीही त्रास , दुः ख झालं तरी पर्वा करण्याचं काही कारण नाही .