पुणेरी मिसळ येथे हे वाचायला मिळाले:
आज एक खूप वेगळीच गोष्ट घडली. कम्पनीतून घरी आले न पाय धुवायला म्हणून बाथरूममध्ये गेले. पाहते तर कमोडच्या कडेवर एक काळा लांब पुंजका दिसला. माझ्या हृदयाचा ठोका चुकला...अभिजीतला हाक मारली पण तो गच्चीवर कपडे आणण्यासाठी गच्चीवर गेले हे लक्षात आले. आता मात्र काय आहे त्याचा छडा आपल्यालाच लावायला हवा हे मी समजून चुकले (एरवी ही कामगिरी मी घरातील पुरुषावर सोडून मोकळी होते.) आणखी जवळ गेल्यावर ती कोणत्यातरी प्राण्याची शेपटी आहे हे लक्षात आले. "अरे बापरे! काय असेल?" छातीत धस्स झाले. तरीही धारिष्ट्य करून आणखी पुढे गेले. तर कमोडमधून २ डोळे वरच्या ...