डॉक्टरसाहेब मुळात ह्या दोघी आमच्या सोबत पाच ते सहा तास असतात. चळमुंगळी आम्हाला जास्त डिवचत नाही असे आम्हाला वाटते. आमच्या शांताबाईना बहुतेक वेळा घड्याळाचा गजरच हाकलून लावतो. तर आम्हाला असे विचारायचे आहे की ह्या शांताबाई किती वेळ सोबत असणे (वयोमाना प्रमाणे) जरूरीचे  आहे? हो अजून एक गोष्ट अशी की ह्या शांताबाई कधी कधी तर आम्हाला जोराने ओरडण्यास भाग पाडतात. इतकं की आम्हाला तर अजिबात काही कळत नाही पण बाजूस झोपलेल्याची शांता धूम ठोकते. याला काय म्हणावे?