अरे वा! अगदी शीर्षकापासून शेवटापर्यंत झकास लेख.

तू पहिलीच ठरवलेली गोष्ट.. घर आरशासारखे स्वच्छ ठेवणे वाचून आश्चर्यच वाटले. फक्त आरसा आरशासारखा स्वच्छ ठेवण्याचे उद्दिष्ट पुरेसे आहे गं.

आमच्या बँकेच्या कॉलनीत न्हाणीघर इ. ची साप्ताहिक स्वच्छता, तीन महिन्यातून एकदा खिडक्या-पंखे स्वच्छता आणि वर्षातून एकदा समग्र स्वच्छता हे ऑफिसतर्फे केले जाते. (तरीही माझे घर आरशासरखे नाही ही माझी करामत.) त्यामुळे निवृत्तीसोपानाची धडकीच भरली तुझा लेख वाचून. नोकरीत आहे तोवरच मी मुक्ताबाई आहे की काय ? कसे होणार नंतर? बाकी तुझ्याप्रमाणेच मलाही घरकामाची आवड नसली तरीही भटकायला जाम आवडते, त्यामुळे निवृत्ती आवडेलच.

बाकी तुझा नवा बेत तडीस जावा यासाठी शुभेच्छा. अजूनही नवे-नवे बेत आख.

छाया