राज्ञ ह्या शब्दापासून राज नंतर राय आला असावा, अशी शंका आहे.
चित्तोबा, (संबोधनाबद्दल प्रसादरावांचे आभार)
आपण फार छान चर्चा सुरू केली आहे.
संस्कृतात राजन् ह्या नकारान्त शब्दाची काही विभक्तीरूपे राज्ञा (तृतीया एकवचन), राज्ञः (षष्ठी एकवचन) अशी होतात असे वाटते.
राज चे राय होणे हे वैदिक शिक्षापद्धतीला अनुसरून आहे असे वाटते. काही शब्दांमधील ज्या अक्षरांचा उच्चार ऋग्वेदात य असा होतो, त्यांचा यजुर्वेदात ज असा होतो असे वाटते. उत्तर भारत, स्कंधप्रदेश (स्कँडिनेविया), पूर्व युरोप इत्यादी प्रदेशांत य च्या ठिकाणी ज वापरला जातो असे वाटते. उदा० युसुफ - जोसेफ, येशु - जीजस , यमुना - जमुना इत्यादी.
चू भू द्या घ्या
आपला
(शब्देतिहासप्रेमी) प्रवासी