चित्त, मैफल, लोकप्रिया, छायाताई, प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!

छायाताई, कणीक तिंबायला १०-१५ मिनिटे लागतील. मला एक सुचले ते असे की तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर त्यात कणीक भिजवली तर त्याच्या पोळ्या चांगल्या होतील  असे वाटते  (तिंबायची गरज नाही) कारण की त्यामध्ये कणीक खूपच चांगली भिजली जाते एकसंध.

पुरणाबाबत - मी नेहमी १ वाटीचेच पुरण घालते त्यामुळे मी पुरणयंत्रातून/फूड प्रोसेसर मधून पुरण बारीक वाटत नाही. हरबरा डाळ अर्धा तास पाण्यात भिजवते व नंतर कूकरला लावते. शिजलेली डाळ साखरगूळ एकत्र करून शिजवते तेव्हाही कालथ्यानेच एकीकडे डाळ अजून जास्त बारीक करते. एक पायरी कमी होते आणि घासण्यासाठी एक भांडे पण कमी.  

ताटामध्ये जो पोह्याचा पापड दिसत आहे ना तो तुम्ही दिलेला आहे  आणि कुरडई भारतातील एका मैत्रिणीने दिलेली आहे  हे पदार्थ मी खूप जपून जपून वापरते. शिवाय थालिपीठाची भाजणीही जपून वापरते.