साधारण्तः जास्तीत जास्त सहा तास + पंधरा मिनिटे इतकी झोप सर्वांना पुरेशी असते. वयोमानानुसार नॉनरेमचा काल कमी होत जातो. लहान मुले जास्त झोपतात, कारण नॉनरेमचा कार्यकाल वाढलेला असतो. याचवेळी मुलांची शारीरवाढ होत असते.
मुख्य म्हणजे सकाळी जागे झाल्यावर एकदम उल्हसित वाटणे, मरगळ जाणे, नवी उमेद अंगी येणे ही चांगली झोप झाल्याची लक्षणे आहेत. मग ती चार तास असो वा आठ तास. शरीर त्याला हवी तितकी पुरेशी विश्रांती घेतच असते. व्यक्तिनुसार ही वेळ बदललेली आढळते.