१) साक्षात्कार म्हणजे काय असावं असं तुम्हाला वाटतं?
हिंदी मध्ये साक्षात्कार या शब्दाचा अर्थ आहे मुलाखत. माझ्यामते दिव्यत्वाशी आपली झालेली मुलाखत म्हणजे साक्षात्कार. हि मुलाखत अपघातनेही होउ शकते किन्वा खुप पाठपुरावा करून (साधना करून) होउ शकते.
२) साक्षात्कार झाला तर जीवनात नक्की काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं?
 या मुद्द्यावर एखादा लेखच लिहावा लागेल. मला इथे प्रतिक्रियेची मर्यादा आहे.
३) आपल्या स्वतःला साक्षात्कार होत नाही याचं कारण काय असावं?
 ओळख नसणे हे खरे कारण. सरकारी कार्यालयात श्री जोशी आले आहेत काय? असे विचारले तर खुद्द जोशी च जोशी आले नाही असे सांगतात. त्यामुळे खरे तर साक्षात्कार झाला असुनही आपल्याला दिव्यत्वाची ओळख नसल्याने तो झाला नाही असे वाटते.
 ४) समाधी म्हणजे काय?
त्रिपुटीचा लोप म्हणजे समाधी. द्र्ष्टा, द्रुश्य आणि बघण्याची क्रिया या त्रिपुटिंचा लोप होउन एकच अनुभव येणे याला पतंजली समाधी असे म्हणतो.