1. ज्याला स्वतःला स्वतःच्या मर्यादेचे भान असते कदाचित त्यालाच साक्षात्कार म्हणत असावे. कारण साक्ष+आकार = साक्षात्कार. जो स्वत:च्या आकाराचा साक्षी असतो तो साक्षात्कारी.
  2. आपल्याला आपल्या मर्यादा माहित झाल्यावर आपण आपल्या मर्यादेपलीकडील कामे न घेता आपोआप यशोमंदिर गाठू शकू कारण मर्यादेच्या पलीकडे आपली अपेक्षा असणार नाही त्यामुळे अपेक्षा भंगाचे दुःखही नाही शिवाय अपेक्षे प्रमाणे माणसाला यश मिळत गेले तर त्याच्या जिवनात आनंदापलीकडे काय असणार बर?
  3. साक्षात्कार होत नाही म्हणजे नेमक काय अपेक्षित ? मी भुकेल्या पोटी काम करू शकत नाही ही माझी मर्यादा आणि मला भुक लागली हा साक्षात्कार नव्हे अस वाटत का? . रात्री अंथरुणावर निजतांना दिवसभर केलेल्या कामाचे रोज सिंहावलोकन करावे म्हणजे दिवस भरात आपण कामात  काय चुका केल्या ते कळत म्हणजे आपल्या मर्यादा स्पष्ट होतात आपल्या मर्यादा कळल्या की मग झाला की साक्षात्कार. आपल्या साठी आपल्या वेळ मात्र देता यायला हवा हे मात्र तेवढच खर.
  4. ...........................