संस्कृत भाषेचा पाया या मराठीकरणाला असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. क्लिष्टपणा टाळावा हे ठीक आहे. पण संस्कृतमधून शब्द घेतांना अपराधी वाटायचे कारण नाही. क्लार्क हा शब्द अंगवळणी पडला होता तरी सुरुवातीला कसातरी वाटणारा लिपिक शब्द आता आपण सहज वापरतोय.