सेव्हन कप्स साहित्य तर समजले ना? मग ते सगळे मिक्स करून ठेवायचे २ तास. छान सैल होते सगळे. आणि मग शिजवायला ठेवायचे. सतत हलवत राहावे लागते.कढईच्या कडेला लागलेले मिश्रण कोरडे व्हायला लागले की झाले असे समजावे. ताटात पसरवून वड्या कापाव्या.
*जरासे जरी खाली लागले तर लालसर रंग येतो मग जरा मजा कमी होते. छान पिवळसर बदामी रंग छान दिसतो.
मी भारतात असताना या वड्या करायला सोप्या वाटायच्या. गॅसची ज्योत कमी जास्त करता यायची. पण अमेरिकेत आले आणि आता कॉईलवर खूप बारीक ठेवून करावे लागते. नाहीतर लगेच रंग बदलतो. आणि दुसरे म्हणजे नारळ खोवायला त्रास वाटतो चमच्याच्या खोवणीने. आणि फ्रोझन नारळाच्या खवाची चव वेगळीच लागते. ताज्या नारळाची मजा त्यात नाही.