वा वा गोळेजी लाजवाब भाषांतर टाकलेत
अचूक उत्तर. अभिनंदन आणि धन्यवाद.
(हृदयस्पंदने व्यापुनी राहसी, आ आ आ आ
विचारांतही तूच तू राहसी) /- २
दुनियेच्या जत्रेत लाखो, परी आ आ आ आ
दुनियेच्या जत्रेत लाखो, परी ।
रुचसी मनाला, हृदी राहसी
मी रे प्रिया तव, तू माझा खचित ॥ १ ॥
(विसरून मला जर का जाशील तू, आ आ आ आ
मजपासूनी लांब जाशील जर तू) /- २
प्रेमात माझ्या आहे शक्ती अशी, आ आ आ आ
प्रेमात माझ्या आहे शक्ती अशी ।
की ओढीने धावशील मजप्रती
पाहा राजसा माझी, होईल जीत ॥ २ ॥
वा वा वा वा. खल्लास भाषांतर. दुसऱ्या कडव्यात १,२, आणि ४ ओळींची यमके जुळली तर मजा येईल.