हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

म्हटलं तर फार फरक नाही. आणि म्हटलं तर खूप फरक आहे. म्हणजे खरं सांगतो. अप्सरा भेटण्याच्या आधी मला दर दहा मिनिटाला एक आवडायची. मुळात मुली एवढ्या सुंदर का असतात हाच न सुटलेला मला प्रश्न आहे. कालच्या त्या एका प्रतिक्रियेने मलाही थोडा वेळ असंच वाटलं होत, की मी अप्सराच्या सौंदर्यावर फिदा आहे? की मला ती खरंच आवडते? काल ती दिवसभर कुठे गायब झाली कुणास ठाऊक आणि त्यात ती प्रतिक्रिया. असंच अप्सरा बद्दल विचार करीत चाललो होतो. तर संध्याकाळची पाचची बस चुकली. मग आणखीन वैताग आला. कारण त्यापुढची बस ७:४५ ला. मग जणू काही जेल मध्येच आहे अस वाटायला लागले ...
पुढे वाचा. : प्रेम आणि आकर्षण