श्री. महेश

असे इतर अनेक शब्द दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद

"कार" हा प्रत्यय क्रिया या अर्थी केला जात असावा काय? बलात्कार = बळाचा वापर करून केलेली क्रिया किंवा चमत्कार = अशक्य कोटीतली गोष्ट करून दाखवण्याची क्रिया. त्याचप्रमाणे साक्षात्कार = (आत्म्याचे) दर्शन घडवून आणण्याची क्रिया

"त्कार"नसला तरी "नमस्कार" शब्दही याच प्रकारचा वाटतो. "नमन करण्याची क्रिया" असा अर्थ असावा.

विनायक