छत गळती हा  काय विषय झालाय. पण काय सांगावे . काय सांगू नये. . दोन महिन्या पासून लपाच्छपी करनारा पाउस  असा बरसू लागला कि काही सुचेनासे झाले. आता आमची  घर जुन्या वळनाच्या लाकडाची   छतावर  मातिचा लगदा . सारखा पाउस कोसळू लागला कि छत टपकू लागते. येथे  पाउस  नच  का  थांबला हळू हळू पाणी चर धरू लागते. मग होते आवरा आवर सुरु. पलंग ; खुर्ची;  टेबल आअपल्या जागा बदलू लागतात. मला तर सारखे शिडी  वरून  खाली-वर करावे लागते.  पाउस थांबे पर्यंत ही सर्कस चालुच  ठेवावी लागेल.