आपल्या प्रतिसादाबद्दल हार्दिक आभार. आपल्या मित्रमंडळीतही हा लेख वाचला जावा असे प्रयत्न करावेत ही प्रार्थना. स्वा. सावरकरांच्या त्रिखंडात गाजलेल्या मार्सेलीस बंदरातील त्या ऊडीला  नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या जीवनावर आधारीत अष्ट"विनायक"दर्शन- पण जरा वेगळे या नावाची एक २४ पानी पुस्तिका मी ८ जुलै २०१०ला प्रकाशित केली आहे. सर्व खर्च मीच केला आहे त्यामुळे थोड्याच प्रती काढल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच प्रती माझ्या जवळच्या मित्रांनी विकत घेऊन त्यांच्या त्यांच्या संपर्कातील मित्रांना वाटल्या व सावरकरांना आदरांजली वाहण्याच्या कार्यात ते बरोबरीचे सहकारी झाले आहेत.
ही पुस्तिका मनोगतच्या माध्यमातून आपल्यासारख्या संवेदनशील व्यक्तिंपर्यंत पोचवावी असा विचार माझ्या मनात डोकावत आहे. साधारण बारा भागात ती द्यावी असे वाटते. या उपक्रमाचे आपण स्वागत कराल अशी आशा आहे. कृपया आपले मत कळवावे.