मालिका (अगदी थोडे अपवाद! नियम सिद्ध करण्यासाठीच जणू!) पाहाणे म्हणजे मेंदूची विचारशक्ती गमविण्यासाठी मुद्दाम वेळ खर्च करणे आहे. आळसाने आळस वाढतो तसे याचे आहे. आपण वेळेचा अपव्यय करतो आहोत हेही मालिकाधीन लोकांच्या ध्यानात येत नाही. हिस्टरी, ट्राव्हल एंड लिविंग, दिस्कव्हरी, नेशनल जिओग्रफी आदी अनेक चांगल्या वाहिन्यांवर कितितरी चांगले कार्यक्रम असतात हे लोकांना माहीत आहे कि नाही याची शंका वाटते.