प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

अहो पण खरंच जसा प्रसंग घडला तसा लिहिला.. त्यातून त्या कंडक्टर ची कंप्लेंट करायला गेलो तर तिथे.. छोटे मियॉं तो छोटे मियाँ... बडे मियाँ सुभानल्ला म्हणायची पाळी आली माझ्यावर....!!

डेपो इन्चार्ज म्हणाला -साहेब तो कंडक्टर तसा नाहीये... अहो कधीतरी होतं अस... नेहमी नाइ... (आणि हसत हसत दुसरीकडे पाहू लागला... )

च्यायला... पु.लं च्या म्हणण्याप्रमाणे -- "कस्पटासमान लेखणे आणि सर्वात दुर्लक्ष करता येणारी गोष्ट म्हणजे गिऱ्हाईक" हे पटलं...

वैतागून बाहेर पडलो,आणि  घरी जाण्यापूर्वी बाहेरच्या टपरीवरून अजून एक पान खाल्लं !!

-आशुतोष दीक्षित.