छान लेख लिहिलाय आशुतोष तुम्ही.
त्यामुळे माझ्याही पुण्यातल्या बसप्रवासाच्या आठवणी (को. डेपो ते म. न. पा.) जाग्या झाल्या आणि नको तो बसप्रवास असेच वाटून गेले. माझा घरी येतानाचा बस स्टॉप अगदी अडनिड (बालगंधर्व) होता. मनपावरून खचाखच भरलेली बस येणार. मग ड्रायव्हर बस अगदी १ सेकंद थांबवल्यासारखी करून पुढे जाणार.... लटका बघू कोण तो पहिला लटके ! अशी कसरत करून हाती पायी धड घरी पोहोचायचे. हा त्रास नको म्हणून कायनेटिक घेतली. पण दुचाकी चालवणाऱ्यांच्या व्यथा (पुण्यातल्या) त्यांनाच माहित ! 'पुण्यात दुचाकी वाहन चालवणे' हा एक निराळा लेखाचा विषय होईल... असो!
पुढील बसप्रवासाकरिता (लेखनाकरिता) शुभेच्छा!
अंजू