माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर! येथे हे वाचायला मिळाले:
आपली शासनयंत्रणा काहीच करत नाही अशी ओरड आपण नेहमी करत असतो, त्यामुळेच की काय, अचानक एखादा तुघलकी निर्णय घेऊन आपले अस्तित्व दाखवून देणे असा प्रकार तिच्याकडून नेहमीच घडताना दिसतो. लेखाचे कारण म्हणजे नुकतेच महाराष्ट्र सरकारने नि पुणे महानगरपालिकेने घेतलेले असेच दोन निर्णय. यातला पहिला निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा. या निर्णयानुसार अनेकपडदा चित्रपटगृहांना यापुढे मराठी चित्रपट दुपारी बाराच्या पुढेच दाखवावे लागतील, याशिवाय असे चित्रपटगृह उभारताना त्यामधे एक पडदा मराठी चित्रपटगृहांसाठी राखूनही ठेवावा लागेल. यातला पहिला निर्णय योग्य वाटत असला नि ...