अंतःप्ररणेनी जगणं म्हणजे निश्चित काय करायचं? वर्तमानात निश्चिंत होऊन कसं जगायचं? विचारांपासून मुक्त होऊन अंतःप्ररणेनी कसं जगता येईल? तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे: समोर बघा!  तुम्ही प्रयोग करून बघितल्या शिवाय कळणार नाही.  अगदी साध्यातला साधा निर्णय घेताना देखील समोर बघा, तुम्हाला सुचायला लागेल!

समोर बघणे (म्हणजेच वर्तमानात असणे) ह्याचा खूप मोठा फायदा आहे. मी देखिल माझ्या ओळखीच्या लोकांना विषय निघाला की हेच सांगतो की समोर बघा म्हणजे सगळे वैताग/दुःख/डिप्रेशन निघून जाईल... अतिशय सोप्पा प्रयोग आहे हा, आपण खाली बघून चालताना आपल्या मनातले विचार हे निगेटिव्ह/"भूतकाळात रमणारे"/"त्याच त्याच गोष्टिंचा पुन्हा पुन्हा विचार करणारे" वगैरे प्रकारातले असतात.