अनाकलनीय येथे हे वाचायला मिळाले:
पुण्याच्या आसपास भटकंतीची अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे पुणेकर जसा वेळ मिळेल तसे हमखास जाऊन येतातच ! पण अशीही काही वसुल अनामिक ठिकाणेही आहेत जिथे किमान एकदा तरी जाऊनच यायला हवे ! खंडाळ्याच्या घाटातला 'ड्युक्स नोज' चा सरळसोट सुळका त्यापैकीच एक ! अगदी पुणे-मुंबई प्रवासात खंडाळा घाटातून जाताना डावीकडे कोकणात कोसळताना दिसणारा हा कातळ म्हणजे 'ड्युक्स नोज'. नाव जरा विचित्रच. विंग्रजी लोकांचा उपद्व्याप दुसरे काय ? नाहीतर हा सुळका 'नागफणी' नावाने सर्वश्रुत आहे. भीमाशंकराच्या इलाक्यातही 'नागफणी' आहे. नाव ...