माझं चर्हाट येथे हे वाचायला मिळाले:
दिल्या: 'अरे मक्या! काय झालं? इतका काय विचार करतोयस?'.. कधी नव्हे ते भरलेल्या साप्ताहिक सभेत विचारमग्न मक्या डोक्याला हात लावून शून्यात बघत बसलेला होता.. हो. बरेच दिवसांनी आमच्या साप्ताहिक सभेचा कोरम फुल्ल होता.. म्हणजे सगळ्या बायका आलेल्या होत्या.. कधी नव्हे ते तिघींना टीव्हीवर कुठलीही मालिका बघायची नव्हती.. कुठेही नवीन सेल लागलेला नसल्यामुळे आणि चालू सेलना भेटी देऊन झालेल्या असल्यामुळे शॉपिंगला जायचं नव्हतं.. 'हसून हसून पोट दुखायला लागेल' अशी जाहिरात केलेलं कुठलंही विनोदी नाटक कम सर्कस बघायची नव्हती... आणि कुठल्याही गोssड हिरोचा पिक्चर ...