प्रत्येक बाबतीत माणूस आणि समाज हे वेगवेगळे असतात, विचार, आचार, वागणे, आवड निवड इ. इ. सध्या समाज हा घटक पूर्णपणे दगड झालेला आहे त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही तो एखाद्या वेगवान प्रवाहात पडल्याप्रमाणे भरकटत चाललेला आहे.  माणूस हा घटक काही वेगळा विचार करेल पण एकदा समाजात मिसळला की झालाच त्याचा दगड. शेवटी समाज म्हणजे माणसांचा समूह त्याच्या मानसिकतेत बदल फक्त माणूसच करू शकेल. प्रत्येकाने ठरविल्यास टीआरपी रसातळाला जाऊ शकतो तरच हे सारे सगळे थांबेल.