अलीकडेच परिस (फ्रान्स ची राजधानी) ला जाण्याचअ योग आला. तेथे एक सरकारी कर्यालय नवीन 'फ्रेंच' शब्द तयार करण्या स पूर्णपणे वाहिलेले आहे. आणि लोक सुद्धा त्यान्नी 'पब्लिश' केलेले शब्द आवर्जून वापरतात असे कळले. पण शेवटी 'गाईड' ने सांगितले की तरीसउद्धा फ्रेंच भाषेवरचा इंग्रजीचा प्रभाव कमी झालेला नाही. त्याउलट, इंग्रजी भाषेने इतर बर्याच भाषेमधले शब्द 'अनग्लिसाईझ्ड' करून आत्मसात केले. 'अनग्लिसाईझ्ड' करणे म्हणजे शब्द बदलणे नव्हे, तर फक्त सोयीचा उच्चार करणे होय. उदा. मरठीतील 'अवतार' बनला 'अवटार'.
शेवटी मी असे म्हणेन की, जोपर्यंत नवीन शब्द किन्वा शब्दसमूह तयार करतानअ तो जर सर्वसामान्य व्यक्तीच्या सोयीचा (इथे बुद्धिजीवी नसणारे अपेक्षित आहेत) विचार न करता केला गेला असल्या स , रोजच्या वापरातला होत नाही आणि विरून जातो.