SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

ज्याप्रमाणे संसारात जाणत्याची आवश्यकता असते त्याप्रमाणे परमार्थात सद्गुरुंची आवश्यकता असते .सद्गुरु भेटल्यावर त्यांना काय विचारावे ते समर्थ सांगतात :
सद्गुरुसी काय पुसावे । हेही कळेना स्वभावे । अनन्यभावे येकभावे । दोनी गोष्टी पुसाव्या । । १२ -३ -३
दोनी गोष्टी त्या कोण । देव कोण आपण कोण । या गोष्टीचे विवरण । केलेची करावे । । १२-३-४
समर्थ सांगतात की सद्गुरूंना दोन गोष्टी विचाराव्या .श्रोते विचारतात : त्या कोणत्या ?
समर्थ उत्तर देतात :
मुख्य देव तो कोण । मग आपण भक्त तो कोण । पंचीकर्ण माहावाक्यविवरण । केलेचि करावे । । १२-३-५ ...
पुढे वाचा. : देव कोण ?मी कोण ?