केशवसुमार यांचा 'पंछी बनू उडती फिरु' या शीर्षकाचा लेख वाचल्यावर माझ्या मनात पहिली प्रतिक्रिया आली की 'आकाशी झेप घे रे पाखरा' ह्या काव्यपंक्ती उत्कृष्ट शीर्षक म्हणून चालू शकल्या नसत्या का? की आपल्या मनाचे एवढे कंडिशनिंग झाले आहे की मराठीतून ठळकपणे जाहीरातबाजी करणे हे डाऊनमार्केट वाटावे? मराठी नाटकांची नावे पाहा, सिनेमांच्या पंचलाईन पाहा, बातम्यांच्या हेडलाईन पाहा सगळीकडे हिंदी व इंग्लिशच दिसते. जणू काही या कंटेक्स्टमधून मराठीला हद्दपार करण्याचा सर्वांनी चंगच बांधला आहे.

या दृष्टीने प्रशासकांचे धोरण मला योग्य वाटते. लगे रहो मुन्नीबाई/टिकून राहा मुन्नीबाई या दोन्ही शीर्षकात योग्यायोग्य काय हे ठरवण्याचा हक्क लेखकाचा असला तरी संचालकांना ते मान्य नसल्याने मराठीत शीर्षक द्यावे हेच उत्तम.

बाय द वे, याच प्रकारे शुद्धलेखनाबाबतही चर्चा करता येईलच की. आजच एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचितंन करणारा फलक वाचला त्यात त्यांचे कतृत्व, वकृत्व आणि नेतृत्व यांची महती गायली होती.