प्रशासकांचे धोरण योग्य वाटते
मनोगतावर मनोगताच्या प्रशासनाने कुठले धोरण राबवावे हे त्यांनी ठरवायचे आहे, ठरवले आहेच. मुद्दा तो नाहीच. मुद्दा असा आहे की शीर्षके बदलल्याने किंवा तत्सम किरकोळ उपायांमुळे मराठी भाषेचे मराठीपण लगेच वाढणार किंवा घटणार आहे काय? त्यामुळे असा कुठला फायदा होणार आहे किंवा तोटा होणार आहे?
आणखी एक: दंगल-ए-खास ह्या खास फारशी-उर्दू शैलीच्या शीर्षकासारखे शीर्षके मराठीत आल्यास काही वाईट नाही. मराठीतल्या फारशी-अरबी शब्दांसाठी फारशी-उर्दूप्रमाणे इज़ाफ़त आल्यास मजाच येईल. काही उदाहरणे: अनेक दिवसात खबरे-तू नाही. बाबा-ए-मन सध्या मुंबईत आहेत.
बाय द वे, याच प्रकारे शुद्धलेखनाबाबतही चर्चा करता येईलच की.
वेगळी चर्चा अवश्य करता येईल. प्रमाणलेखनाचे महत्त्व आपल्याजागी आहेच.
जाता-जाता
तुमच्या प्रतिसादात कंडिशनिंग, डाउनमार्केट, पंचलाइन, हेडलाइन, कंटेक्स्ट
हे शब्द वापरून तुम्ही एकाप्रकारे मराठीच्या अभिवृद्धीस आपल्यापरीने
हातभारच लावला आहे. असे शब्द वापरल्याने मराठीचा संकोच होणार नाही. झाली
तर भरभराटच होईल. ह्यावरही चर्चा व्हायला हवी.