गद्य साहित्य विभागात लिहाल का? तुमच्या लेखना वरून तुमचे विचार सुत्रबद्ध वाटतायंत. लेखाचा सर्वांना उपयोग होईल.

तुम्ही म्हणता तशी आध्यात्मिक प्रक्रिया देखील अत्यंत मजेशीर आहे. साधक शास्त्रज्ञा सारखा अथक सत्याचा शोध घेत राहातो. एक दिवस तो सगळे प्रयत्न सोडून देतो आणि मग त्याला लक्षात येतं की आपण स्वतःलाच शोधत होतो! आपल्याला काही करायची गरज नव्हती फक्त वर्तमानात स्थिर व्हायचं होतं. माझी ही वाक्य सर्क्युलर वाटतील पण निराकाराला निराकार शोधतो ही वस्तुस्थिती आहे. साधकाला जेव्हा निराकार डोळ्या समोर दिसतो आणि हे देखील लक्षात येतं की आपण ही मुळात निराकारच आहोत तेव्हा सगळे प्रश्न एका क्षणात सुटलेले असतात!

संजय