सर्व नात्यांचं मुळ 'लग्न' आहे आणि लग्न हीच कल्पना आहे, मान्यता आहे त्यामुळे सर्व नाती कल्पना आहेत.

कुटुंबसंस्था (खरं तर एकत्र कुटुंबसंस्था) हा भारतानी, जगणं शेवट पर्यंत सुखाचं व्हावं असा पॅटर्न सुचवला आहे. जेव्हा आपण विभक्त कुटुंब पद्धती स्विकारली तेव्हा आपली मुलं आपल्याला सांभाळणार नाहीत ही गोष्ट आपल्या लक्षात आली नाही. आज जागतिकरणामुळे आपण जास्त समृद्ध झालोत आणि आपल्याला कुटुंब व्यवस्थाच नको आहे! कुणालाच कमीटमेंट नको आहे, सुप्रिम कोर्टनी  'लिव्ह इन रिलेशन्शिप' मध्ये काही अयोग्य नाही असा निकाल दिल्यावर तर ज्यांना ज्यांना म्हणून संधी हवी होती त्यांना रान मोकळं मिळालं आहे! आपण मानवी जीवनाचा जर समग्रतेनी विचार केला तर कुटुंब हा एकमेव पर्याय, कौशल्यानी आणि निष्ठेनी वापरला तर जगणं मजेचं करू शकतो.

जगाचं आपण काही करू शकत नाही, ज्याच्याशी आपण कमीटेड राहू आणि जो आपल्याशी कमीटेड राहील असा साथीदार पूर्ण अक्कल हुशारीनं निवडू शकतो आणि आपलं जगणं सुखाचं करू शकतो. माझ्या एका मित्राचे चवतिसाव्या वर्षी दोन डिवोर्स झालेत! डिवोर्सच्या केसेस हँडल करणारे वकील तर इतके मजेत आहेत की बोलता सोय नाही.  माझ्या मते तरी येत्या भविष्यात पाश्चात्य देशांप्रमाणे भारतातल्या कुटुंब व्यवस्थेचा संपूर्ण बाजा वाजलेला असेल. 

संजय