मुद्दा असा आहे की शीर्षके बदलल्याने किंवा तत्सम किरकोळ उपायांमुळे मराठी भाषेचे मराठीपण लगेच वाढणार  किंवा घटणार आहे काय? त्यामुळे असा कुठला फायदा होणार आहे किंवा तोटा होणार आहे?

शीर्षके बदलल्याने किंवा तत्सम किरकोळ उपायांमुळे मराठी भाषेचे मराठीपण लगेच वाढणार  किंवा घटणार आहे असे मला वाटत नाही. प्रशासन ह्याचा आग्रह धरते कारण हा केवळ धोरणाचा भाग असावा. ('असावा' म्हणजे मी अंदाज व्यक्त केला आहे आणि 'असावा' म्हणजे तशी अपेक्षा पण व्यक्त केली आहे! )  काही परभाषिक शीर्षकांना अधिक चपखल मराठी शीर्षके देणे शक्य असते तर काही ठिकाणी लेखकाने दिलेली परभाषिक शीर्षकेच जास्त चांगली वाटतात. एक वाचक म्हणून मी असा भेद करू शकते. पण प्रशासनाला असा पक्षपात करणे शक्य होणार नाही असे मला वाटते.