संजय,
    एकूण वरील वाचून असे वाटते, की माणसाने माणुसपणापासून जास्तित जास्त दूर जाणे म्हणजे अध्यात्म.
प्राणी विचार करू शकतात की नाही हे माहीती नाही, पण प्राणी 'उद्याचा' किंवा एकुणच भविष्याचा विचार करत नसावेत. भविष्यासाठी बेगमी (मुंग्या माश्या अपवाद) करण्याची फारशी पद्धत नाही त्यांच्यात. भविष्याची बेगमी करणारे प्राणीही कित्येक पिढ्या त्याच प्रमाणे वागत आले आहेत, आजुबाजुच्या वातावरणात बदल घडल्यास आपल्या सवयींमध्ये बदल करून घेण्यात ते कमी पडतात, आणि त्यांची संख्या घटते.
   तर असा पुढील विचार करणे, एका पीढिने मिळवलेले ज्ञान दुसर्या पीढिला देणे, आणि दुसरीने त्यात भर टाकणे, कसलीतरी चिंता करणे, हे माणसाचे गुणधर्म आहेत. आता तेच नेमके करू नये असे एकूण लेखमाल वाचून वाटते. अंदमानात राहणारे आदीम लोक , जे पीढ्यानुपीढ्या होते तसेच आहेत ते, आपल्या सारख्या प्रगतीशील (आता याला प्रगती म्हणायचे की नाही हा वाद बाजूला ठेवू) लोकांपेक्षा अध्यात्मात अधिक 'पोचलेले' आहेत का?